नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्यावर मटका जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाई रोकडसह जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
हरिश्चंद्र पेशमुल भोजवाणी उर्फ हरी शेख (रा.दत्तचौक,सिडको),रंगनाथ रामभाऊ साबळे (रा.भगतसिंगनगर,अल्को मार्केट शेजारी),आसिफ मोहम्मद पटेल (रा.चाटोरी ता.निफाड),शाम सिताराम गवे (रा.शिवपुरी चौक उत्तमनगर,सिडको),सुभाष रघुनाथ काळे आणि अन्वर अब्दुल करीम पठाण (रा. दोघे सावरकर चौक,महाराणा प्रताप चौक,सिडको) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत.
याबाबत युनिटचे हवालदार परमेश्वर दराडे यांनी फिर्याद दिली आहे. महामार्गावरील अल्को मार्केट भागातील भगतसिंग नगर वसाहतीतील म्हसोबा महाराज मंदिरालगत असलेल्या मोकळया जागेत काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१४) सायंकाळी पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित अंक अकड्यावर कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या अगझडतीत सुमारे ७ हजार १०० रूपयांची रोकड मिळून आली असून अधिक तपास जमादार साळी करीत आहेत. ही कारवाई जमादार यशवंत बेडकोळी, हवालदार शंकर काळे,नंदकुमार नांदुर्डीकर,परमेश्वर दराडे,सुनिल आहेर,वाल्मिक चव्हाण,प्रकाश महाजन पोलीस नाईक नितीन फुलमाळी व जितेंद्र वजीरे आदींच्या पथकाने केली.