नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्स्टाग्राम रिल्स बनविणाऱ्या तरुणीने नाशिकमध्ये तब्बल ३ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुजा विशांत भोईर असे या तरुणीचे नाव आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावाने तिने ही फसवणूक केली आहे.
पुजा भोईर हिच्या विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पुजा भोईर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तिची कसून चौकशी सुरू आहे. अतुल सोहनलाल शर्मा यांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची शहानिशा केली. त्यानंतर पुजा विरुद्ध गुन्हा दाखल केला.
पुजा भोईर ही ठाणे येथील रहिवासी आहे. नाशिक पोलिसांनी ठाण्यात जाऊन तिला ताब्यात घेतले आहे. तिची सध्या कसून चौकशी सुरू आहे. शर्मा याची पुजा हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर पुजा हिने शर्मासह अनेकांची फसवणूक केली आहे.
Nashik Crime Instagram Reels Cheating