नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक देवाण घेवाणीतून अज्ञात टोळक्याने हॉटेल मालकास मारहाण करीत चाकू हल्ला केल्याची घटना बिटको चौकात घडली. याप्रकरणी जखमीने दिलेल्या तक्रारीवरून हल्ला घडवून आणणाऱ्या त्याच्या मामे भावाविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील अरूण मोरे (रा.भगूर देवी मंदिराजवळ,दे.कॅम्प) असे हल्ला घडवून आणणाºया संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विपूल प्रकाश बागुल (रा.नारायणबापूनगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बागुल यांचे बिटको चौक भागात लिफीव्हेज हॉटेल असून ते रविवारी (दि.२२) रात्री आपल्या हॉटेल समोर फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. बागुल यांनी त्यांचा संशयित मामेभाऊ निखील मोरे यांच्या कारच्या कर्जाचे हप्ते भरले होते. कालांतराने त्यांनी पैश्यांची मागणी केल्याने हा हल्ला घडविण्यात आल्याचा संशय असून बागुल आपल्या हॉटेल समोर फेरफटका मारीत असतांना अज्ञात चार जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवित लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त एकाने त्यांच्यावर धारदार चाकूने वार केला. या घटनेत हॉटेलचेही नुकसान करण्यात आले असून मामेभावाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.
बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू
बांधकाम साईटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना कोनार्क नगर परिसरातील वृदावननगर भागात घडली. या घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
किरण वाल्मिक कुमावत (रा.जिजामाता हौ.सोसा कामटवाडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. कुमावत सोमवारी (दि.२३) जत्रा हॉटेल परिसरातील लभडे नगर २ येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या हर्ष अपार्टमेंटच्या साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. तिसºया मजल्यावर बांधकाम करीत असतांना तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने मेहवूने दगडू बेलदार यांनी त्यास तात्काळ नजीकच्या लोमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता रात्री उपचार सुरू असतांना डॉ.केतन गांधी यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ करीत आहेत.
Nashik Crime Hotel Owner Knife Attack