तपोवनात मित्रांनीच लुटले मित्राला
नाशिक – तपोवनात तिघा मित्रांनी त्यांच्यातील एकाला तपोवनात फोन करुन बोलावून घेत त्याच्या अंगावरील सुमारे दीड लाखाचे दागिणे व मोबाईल लुटल्याचा प्रकार उघडकीस आला. तपोवनात गोदावरी कपिला संगमावरील रामटेकडी रस्त्यावरील मलशुध्दीकरण केंद्राजवळ शुक्रवारी साडे आठला हा प्रकार घडला. स्वप्नील उनवणे, विक्रांत नेटावटे उर्फ टक्या, (निमाणी राजवाडा पंचवटी) आणि
दाद्या पूर्ण नाव नाही अशी तिघा संशयितांची नावे असून या तिघांनी त्यांचा मित्र हर्षल अनिल जाधव (वय २१, रामसृष्ट्री अपार्टमेंट चव्हाणनगर पंचवटी) याला शुक्रवारी फोन करुन बोलावून घेत त्याच्या कडील १७ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, साडे तीन तोळ्याची सोन्याची चेन आणि सॅमसंग गॅलक्सीचा मोबाईल असा ऐवज काढून घेतला. व तिघेही मोपेड स्कुटीवर बसून पळून गेल्याची तक्रार हर्षल याने आडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
म्हसरुळला चौघांची एकास मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरुळ शिवारातील गोरक्षनगर भागात चौघांनी एकाला मारहाण केली. आदित्या पिंगळे उर्फ तात्या, साहिल पूर्ण नाव नाव नाही त्याचे दोन साथीदार अशी चौघांची नावे आहेत. शुक्रवारी (दि११) रात्री साडे नउच्या सुमारास किशोर सुर्यवंशी मार्गावरील शिवसमर्थनगरला गणपती मंदीराच्या पुढे ओंकार बंगल्याजवळ प्रकाश दोबाडे याच्यासोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून आदित्या पिंगळे यांने हातातील धारदार शस्त्राने अनिल दोबाडे याच्यावर वार केला तर इतरांनी शिवीगाळ करीत गाडीचे नुकसान केले. म्हसरुळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.