नाशिक – आनंदवली शिवारातील दोन फ्लॅटची विश्वासघाताने परस्पर विक्री करत ९५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
अविनाश तुकाराम येवले (रा. राजश्री एम्पायर, अभियंतानगर, कामटवाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गंगापूर रोडवरील श्री बालाजी बिल्डर्स अॕण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्थेमध्ये (लॕण्डस्केप अपार्टमेंट, स्वामी समर्थ चौक, गंगापूर रोड) २०१७ ते १७ मार्च २०२१ दरम्यान फसवणुकीची ही घटना घडली. येवले यांच्या तक्रारीनुसार, बालाजी बिल्डर्स डेव्हलपरचे भागीदार रविंद्र धोंडु पाटील, केशव राजाराम पाटील (फ्लॅट क्र. ७, राधाकृष्ण अपार्टमेंट, रामेश्वर नगर, गंगापूर रोड) तसेच दिनकर दयाराम पाटील (जळगाव), संजयसिंग दौलतसिंग परदेशी (रा. औदुंबर स्टॉप, सिद्धेश्वर मंदिराजवळ, नवीन सिडको) यांच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अनिल पवार तपास करत आहेत.
बालाजी बिल्डर्स डेव्हलपरचे भागीदार रविंद्र पाटील व केशव पाटील यांनी मौजे आनंदवली शिवारातील इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १ तसेच दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५ कार पार्किंगसह हातउसणवार पावती दस्त लाभात नोंदवून दिले होते. त्या बदल्यात ९८ लाख २० हजार रुपये चेक व रोख स्वरुपात दिले होते. दोन्ही फ्लॅटचा साठेखत करारनामा झाला असताना संशयितांनी संनमताने ते फ्लॅट दिनकर पाटील व संजयसिंग परदेशी यांना विकले.