नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सुरगाणा तहसील कार्यालयामध्ये एका शेतकऱ्याने थेट नायब तहसिलदाराच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायब तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सातबाऱ्यावर माझं नाव का नाही आलं? अशी विचारणा करत शेतकरी भारत गुलाब पवार यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडली. तसेच, कानशिलात लागावली. हा सर्व प्रकार तहसील कार्यालयातच घडला. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार घडला त्यावेळी पवार यांच्या सोबत आणखी दोन जण उपस्थित होते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्या शेतकऱ्यासह त्याच्या सोबत असलेल्यांनी पळ काढला. त्यानंतर मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली.
तक्रारीत नमूद करण्यात आलेले शेतकरी भारत पवार हे हट्टी येथील आहेत. वडिलांच्या नावानंतर सातबाऱ्यावर माझे नाव का लावले नाही, इतरांचे सर्वांचे नाव लावले माझ का नाही? अशी विचारणा केली. तुम्ही लेखी अर्ज करून द्या मग ते नावं लागेल असे नायब तहसिलदारांनी सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या पवार यांनी थेट मोरे यांच्या शर्टची कॉलर पकडली. मोरे यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण पवार यांनी थेट मोरे यांच्या कानशिलात लगावली.
Nashik Crime Farmer Nayab Tahsildar Fight