नशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी शिक्षणाधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माजी शिक्षणाधिकारी प्रविण वसंत अहिरे (रा. गोविंदनगर) याच्या विरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिरे याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. गेल्या सहा वर्षांपासून अहिरे याने वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करीत शारिरीक अत्याचार केले. सहा वर्षांपूर्वी पीडिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी अहिरे यांच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. काही कालावधीने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याचदरम्यान संशयित अहिरे याने पीडितेला विश्वासात घेत लग्न करण्याचे आमिष दाखविले. २०१६ पासून आतापर्यंत पीडितेसोबत वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड पोलिसांनी संशयित अहिरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला व संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून मागील सहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित अहिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सखोल तपास केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फडोळ या करीत आहेत.