अतिक्रमणाची तक्रार केल्याने ज्येष्ठ नागरिकास मारहाण
नाशिक – खोडेनगरला गिरणीचे पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेकडे तक्रार केल्याने त्याच्या रागातून दोघांनी एकनाथ खंडेराव जाधव (वय ६४, डायमंड कॉलनी, खोडेनगर या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. याप्रकरणी शारदा गांगुर्डे व गोरख गांर्गुडे यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महापालिका अतिक्रमण पथकाने गांर्गुडे यांच्या पिठाच्या गिरणीचे पत्र्याचे शेड काढले. ही कारवाई जाधव यांच्या तक्रारीवरुन झाल्याची संशयावरुन शनिवारी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
पार्किंगमधील दुचाकी लांबवली
नाशिक – शहरात दुचाकी चोरीच्या घटनात गुन्हे दाखल झाले आहेत. अरविंद चिमनराव निकुंभ (वय ५४,अक्षय इस्टेट, त्रिकोणी गार्डन जवळ द्वारका) यांनी त्यांची हिरो होंडा स्ल्पेंडर दुचाकी (एमएच १५ ऐआर ५०२०) शनिवारी (दि.१२) सकाळी दहाला त्यांच्या घराजवळील त्रिकोणी गार्डन परिसरातील अक्षर इस्टेट जवळील पार्कींगमध्ये लावली असता चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली.याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.