नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील उपनगरमध्ये अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याचनिमित्ताने नाशिक शहरात महिला व मुली असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. उपनगरातील एका वस्तीत राहणाऱ्या आणि अर्धांगवायूने ग्रासलेल्या वृद्धेवर रात्रभर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल आवारे (वय २२) या संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्धांगवायू झालेली ही वृद्ध महिला पत्र्याच्या घरात एकटीच राहते. काल रात्रीच्या सुमारास तिच्या खोलीमध्ये संशयित साहिल आवारे हा युवक आला. ही महिला खोलीत एकटीच राहत असल्याचे या युवकाला माहिती होते. त्याने या वृद्धाला धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, रात्रभर त्याने हे घाणेरडे कृत्य केले. शिवाय त्याने त्याच्या मोबाईलमध्ये या घाणेरड्या कृत्याचे फोटोही काढले. या सर्व प्रकारामुळे ही वृद्ध महिला अतिशय भयभित झाली. आज सकाळच्या सुमारास या वृद्ध महिलेने हा सर्व प्रकार तिच्या भावाकडे कथन केला. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कसोशीने तपास करीत साहिलला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Nashik Crime Elder Women Rape by Youth in Upnagar
Police