स्विमिंग पूलमध्ये बुडून एकाचा मृत्यू
नाशिक – सोसायटीच्या स्विमींगपुलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.३०) सायंकाळी देवळाली कॅम्पच्या लॅमरोड परिसरात घडली.
किर्तीकुमंार पोपटलाल शहा (५२, रा. मेरू भूमी सोसायटी, लॅरोड, देवळाली कॅम्प) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार किर्ती हे रविवारी सायंकाळी सोसायटीच्या स्विमींग टँकमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पोहता येत होते. परंतु दरम्यान त्यांचा मृतदेह स्विमींग टँकमध्येच आढळून आला. शवविच्छेदनामध्ये बुडून मृत्यू झाल्याचे निदाने आले आहे. परंतु त्यांनाचांगले पोहता येत असल्याने पाण्यात विजेचा धक्का लागला काय याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक पानसरे करत आहेत.
—
शहरात दोघांच्या आत्महत्या
नाशिक – शहरात आत्महत्या करणरांचा आकडा वाढत असून सोमवारी विविध घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकार घडले.
पहिली घटना बनकर चौक येथे सोमवारी (दि.३१) रात्री घडली. निरद देविचरण चव्हाण (२२, रा. सध्या बनकर चौक, मुळ बुगंज जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) असे आत्महत्या करणार्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री निरद याने राहत असलेल्या नवीन बाधंकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मिसर्या मजल्यावर जिन्यातील बांबुला आढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत पेठरोड पसिरात राहणारे विलास एकनाथ हाडके (६०) यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरात फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
—
युवतीचा विनयभंग
नाशिक – सतत पाठलाग करून, अश्लिल बोलत एकाने युवतीचा विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली. निखील पुंजाराम गबाले (२३, रा. आडसरे, ता. इगतपुरी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित हा गूली आठवडाभरापासून पिडीतेचा पाठलाग करून अश्लिल इशारे करत आहे. तसेच बळजबरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. रविवारी त्याने पिडीतेचा हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक गांगुर्डे करत आहेत.