नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील तिवंधा लेन भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडी चांदीचे भांडी बनविण्याच्या कारखान्यात झाली असून चांदीच्या पत्र्यांसह भांडी भामट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल राजाराम घोडके (रा. भाभानगर, मुंबईनाका) यांनी तक्रार दाखल केली आहे. घोडके यांचा तिवंधा लेन येथील घर नं. १९५० मध्ये चांदीचे भांडी बनविण्याचा कारखाना आहे. गुरूवारी (दि.१७) रात्री अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. कारखानात शिरलेल्या चोरट्यांनी भांडे बनविण्यासाठी तयार केलेले चांदीचे पत्रे, लोटी,पेला,वाट्या कलश आदी प्रकारचे सुमारे ६ लाख ९३ हजार रूपये किमतीचे भांडे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
तलवार बाळगणारे तिघे जेरबंद
धारदार तलवारी बाळगणाऱ्या त्रिकुटास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून सुमारे ३ हजार ५०० रूपये किमतीच्या तलवारी हस्तगत करण्यात आल्या असून त्यांनी त्या कोठून व कश्यासाठी आणल्या याबाबत पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताहिर भैय्या मनियार (२२), अरबाज अकबर पटेल (३१) व दिपक जगन्नाथ वाघमारे (२२ रा. सर्व वडांगळी, ता. सिन्नर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ््या समोरील उड्डाणपूलाखालील रिक्षा स्टॅण्ड जवळ उभ्या असलेल्या तरूणांकडे तलवारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१८) पोलिसांनी धाव घेत ही कारवाई केली. पोलिसांनी या त्रिकुटास ताब्यात घेत अंगझडतीत घेतली असता संशयितांकडे धारदार तलवारी मिळून आल्या. याबाबत पोलिस शिपाई कल्पेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.
Nashik City Crime Dacoity Theft Arrested Police