नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेट्रींग काम करीत असतांना बिल्डींगवरून पडल्याने ३३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना पगारे मळा भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने पुन्हा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसात चार ते पाच बांधकाम कामगारांचा बळी गेला आहे.
संदिप कुमार प्रसाद (३३ रा.बोराडे मळा, राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ जेलरोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रसाद सोमवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास पगारे मळा भागात नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सेट्रींगचे काम करीत असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने ते इमारतीवरून पडले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने संपत खुरपे यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.अंभोरे यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.
? *रामशेजच्या पोटात आढळल्या ११ गुहा*
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या शोध मोहिमेत आढळला दुर्मिळ वारसा
https://t.co/NaA9lCv5Ac#indiadarpanlive #nashik #ramshej #fort #guha #conservation— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 11, 2023
?सरन्यायाधीश संपातले! *म्हणाले,'माझ्या अधिकारांशी खेळू नका'*
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
https://t.co/oimt4YZrqO#indiadarpanlive #supreme #court #cji #furious #lawyer#dhananjay #chandrachud— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 11, 2023
Nashik Crime Construction Worker Security Death