नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कागदपत्राच्या आधारे मुंबईस्थित एकाचा भूखंडाचा परस्पर व्यवहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महसूलच्या फेरफार नोंदीवरून हा प्रकार पुढे आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये दोन महिला वकिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका पाटील,अनिल पाटील,अजय कासकर,अॅड.स्वाती पाटील,अॅड मुंजल जोशी व अन्य एक अशी संंशयितांची नावे आहेत. या प्रकरणी संजीव लक्ष्मीकांत चौधरी (रा.पवई मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यांच्या मालकिचा महापालिका हद्दीतील सर्व्हे नं. ८२०/१ अ, २अ / १/२ या मिळकतीवर तयार करण्यात आलेल्या अंतिम मंजूर ले आऊट मधील प्लॉट नं.५ याचे एकूण क्षेत्रफळ २१३.६८ चौ.मि. हा मालकीचा आहे.
संशयितांनी संगनमत करून बनावट कागदपत्राच्या आधारे आपआपसात खरेदी विक्री व्यवहार केला. हा प्रकार ११ मार्च २०२२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय येथे करण्यात आला. याबाबत ७/१२ उताºयावर फेरफार नोंदी करण्यात आल्याने या घटनेचा उलगडा झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सूरी करीत आहेत.
Nashik Crime Cheating 6 Suspects booked with 2 women lawyer police