नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरालगत असलेल्या चांदशी शिवारातील दोन हॉटेल्सवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिक्षकांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने चांदशी शिवारातील हॉटेल रायबा आणि हॉटेल स्टड फार्म या दोन हॉटेल्सवर छापा टाकला आहे. शहरातील असंख्य तरुण या हॉटेल्समध्ये येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोन्ही ठिकाणी कुठले अवैध काम सुरू होते याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, काही तरी गंभीर प्रकार घडत असल्याचे समजते. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)