नाशिक – शहरात चेनस्नॅचर्सचा धुमाकूळ सुरूच असून त्यांनी आता लग्न समारंभांकडे लक्ष वळविले आहे. नणंदच्या विवाहात कन्यादान वस्तू खरेदी करून मंडपाकडे परतणा-या भावजयीच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना आडगाव गावात घडली. याप्रकरणी आडगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता खंडेराव बलसाने (रा. मागवाडा, आडगाव) यानी तक्रार दाखल केली आहे. बलसाने याच्या नणंद बाईचा मंगळवार (दि.28) सायकाळी आडगाव येथे विवाह होता. रात्री वधूची बिदायी कार्यक्रम सुरू झाल्याने बलसाने दाम्पत्य आपल्या घराजवळील दुकानात कन्यादान वस्तू खरेदी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. तपकिरे याच्या दुकानातून खरेदी करून बलसाने दाम्पत्य सय्यद पिंप्री रोडने आडगाव स्टॅन्ड च्या दिशेने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी महिलेच्या गळ्यातील सुमारे 24 हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली.अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.