नाशिक – शहर परिसरात नाशिक पोलिसांचा धाक कमी झाला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चेन स्नॅचर्सने पोलिसांच्या नाकावर टिच्चून भर दिवसा चेन स्नॅचिंगचे गुन्हे करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुरूवारी (७ ऑक्टोबर) दिवसभरात लागोपाठ चैनस्नॅचिंगच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये पादचारी महिलांच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रूपये किंमतीचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी सरकारवाडा,उपनगर आणि अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शरणपूररोडवरील कल्पना दिलीप येवले (रा.राका कॉलनी) या गुरूवारी सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातून चक्कर मारून त्या शरणपूररोडवरील सरगम सोसायटीच्या प्रवेशद्वारा समोरून पायी आपल्या घराकडे जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ६२ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
दुसरी घटना नाशिकरोड भागात घडली. मोटवाणी रोड भागात राहणाºया श्वेता मकरंद पिसोळकर (रा.यशवंत बंगलो,आनंद सोसा.) या गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या मैत्रीणींसमवेत देवदर्शनासाठी गेल्या होत्या. सेंट फिलोमिना शाळेजवळील देवी मंदिरातील देवदर्शन आटोपून सर्व मैत्रीणी घराकडे परतत असतांना ही घटना घडली. फिलोमिनी शाळे समोरून महिला पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने स्वाराने पिसोळकर यांच्या गळ््यातील सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.
तर कामटवाड्यातील अभियंता नगर भागात राहणाºया ललिता यशवंत जाधव (रा.शिवतीर्थ कॉलनी) या सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. उमा हॉस्पिटल मागून त्या पायी जात असतांना नगरसेवक श्याम साळवे यांच्या घरासमोर पाठीमागून तोंडास रूमाल बांधून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ््यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र खेचून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
दरम्यान शहरात गेल्या काही दिवसांपासून चैनस्नॅचरांनी धुमाकूळ घातला असून पोलीसांनी त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढू लागली आहे. दरडोई एक दोन घटना घडत असल्याने महिलावर्गास घराबाहेर पडणे मुस्कील झाले असून, सर्वत्र भितीचे वातावरण आहे.