नाशिक – अमृतधाम परिसरातील के के वाघ कॉलेज येथे असलेल्या कोणार्क नगर येथे आज एक धक्कादायक घटना घडली. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची बिघडलेली वायर दुरुस्त करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी हरी टिळे व अन्य कर्मचारी हे कोणार्कनगरला आले होते. रस्त्यालगत उड्डाणपुला खाली ते हे काम करत होते. मात्र, त्याठिकाणीच मोठे खोदकाम करण्यात आले असल्याने अचानक मातीचा मोठा ढिगारा टिळे यांच्या अंगावर पडला. त्यामुळे ते मातीखाली दाबले गेले. तातडीने अग्निशमन दलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र, तब्बल १० ते १५ फूट खोल असलेल्या खड्ड्यातील मातीच्या या ढिगाऱ्यात टिळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर, अन्य कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.