नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंबरच्या वादातून दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत लोखंडी फायटरचा वापर करण्यात आल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पेठफाटा परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर अशोक मुळे (२७) असे मारहाण करणाऱ्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश कैलास जाधव (रा.विजय चौक,फुलेनगर) या रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली आहे. जाधव याने बुधवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास पेठ फाटा परिसरातील उत्तम हिरा हॉटेल भागातील रिक्षा थांब्यावर आपली अॅटोरिक्षा प्रवाशी भरण्यासाठी नंबरवर पार्क केली असता ही घटना घडली.
संशयिताने आपला नंबर असल्याची बतावणी करीत जाधव यांना शिवीगाळ केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दीक चकमक होवून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत मुळे याने जाधव यास लोखंडी फायटर मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास
ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यास एक लाख ३५ हजाराची रोकड आणि चांदीचे नाण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघेश रामसागर चौबे (५४ रा.विधातेनगर,रविशंकर मार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. चौबे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून परिसरातील वरदविनायक कॉलनीतील सुंदर श्याम सोसायटीत त्यांचे कार्यालय आहे. मंगळवारी (दि.११) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद कार्यालयाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली एक लाख ३५ हजाराची रोकड आणि चांदीचे देव आणि नाणी असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
?मौजे निंबर्गीच्या सिद्धाराम ऐवळे या शेतकऱ्याची कमाल
*दुग्ध व्यवसायातून घेतोय रोज एक हजाराचे उत्पन्न*
https://t.co/B8WGDhQrp6#indiadarpanlive #solapur #farmer #success #story #animal #farming— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 13, 2023
⬜ *या कारणामुळे गळतात केस* होमिओपॅथीद्वारे यशस्वीरित्या उपचार शक्य
https://t.co/q46MiSYmgx#indiadarpanlive #hair #fall #reasons #homeopathy #treatment #health— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 13, 2023
Nashik Crime Auto Rikshaw Driver Fight