नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचारी आणि त्याच्या साथीदारावर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली असून यामध्ये दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको वसुलीसाठी गेलेल्या एका फायनान्स कंपनीच्या एजंटसह त्याच्या साथीदारावर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. गणेश बापूराव फाफळे (वय ३४ रा. विडी कामगार नगर) किरण भास्कर फाफळे (वय ४० रा गणेश चौक )असे हल्लात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुनील देशमुख (रा .दातीर मळा अंबड) याने बजाज फायनान्स या कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी गणेश बापूराव फाफडे यांनी फोन केला असता त्यांना पैसे घेण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीत बोलावलेयावेळी गणेश फाफळे यांनी त्याच्याकडे थकीत पैसाची मागणी केली.
संशयित आरोपी देशमुख याने त्यांना शिवीगाळ करत बॉटलीमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ गणेश फापळे व त्यांचा सोबत असलेले त्यांचा मित्र किरण फाफळे यांच्या अंगावर टाकला. या दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime Attack on Finance Recovery Employee