नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षक प्रणिता दीपक पवार आणि पोलिस नाईक तुषार मधुकर बैरागी हे २० हजार रुपयांची लाच घेताना सापडले आहेत. एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासाठी या दोघांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. अखेर प्रणिता पवार आणि तुषार बैरागी यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तिवंधा पोलिस चौकीत २० हजार रुपयांची रक्कम स्विकारली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने तातडीने त्यांना ताब्यात घेतला. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.