नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. त्यात अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि पंचवटीत एक गुन्हा दाखल आहे.
अंबड येथे गुरुवारी (दि. १७) सराईत गुन्हेगारांनी मयूर दातीर या युवकाचा खून केला. त्यामुळे अंबड ग्रामस्थांनी मारुती मंदिरापासून पोलिस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढला होता. तसेच आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी मोर्चेकऱ्यांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार, संशयित साहेबराव गंगाधर दातीर, रामदास दातीर, दीपक दातीर, राकेश दोंदे, शरद फडोळ, खंडेराव दातीर, रामदास गोविंद दातीर, बाजीराव दातीर, गोकुळ दातीर, नितीन दातीर, समाधान शिंदे, मुन्ना दोंदे, चिन्या दातीर, अक्षय फडोळ, प्रवीण दातीर यांच्यासह इतर ९० ते १०० ग्रामस्थांवर गुन्हा नोंदविला आहे. आंदोलन व निषेध सभेतून पोलिस प्रशासनाला वेठीस धरत जमावबंदी व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद
गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची लोखंडी गावठी बनावटीची पीस्टल हस्तगत केली आहे. राजन कुमार गुलाबचंद कहार (वय ४१ वर्ष, रा. गणेश रोबंगलो नं. ०४, प्रसन्न नगर, पाथर्डी फाटा) असे संशयित आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पो शी संदिप भुरे यांना गोपनिय माहिती मिळाली की , एक संशयीत इसम हा म.न.पा. शाळा, गणेशचौक, येथे बेदायदेशीररित्या विनापरवाना गावठी कट्टा (पिस्टल) त्याचे कंबरेस बाळगुन उभा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पोउनी नाईद शेख, पोशि सागर जाधव पोशी घनशाम भोये, यांनी सापळा रचुन संशयित आरोपी राजन कुमार गुलाबचंद कहार (वय ४१ वर्ष, रा. गणेश रोबंगलो नं. ०४, प्रसन्न नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेस एक लोखंडी गावठी बनावटीची पिस्टल लावलेली असलेली मिळुन आली. सदरची कार्यवाही अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, . प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक अशोक नजन (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोऊनी नाईद शेख, पवन परदेशी, सचिन करंजे , राकेश राऊत , समाधान शिंदे, प्रविण राठोड, सागर जाधव, घनशाम भोये, अनिल गाढवे, राकेश पाटिल यांच्या पथकाने केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला कावळे करीत आहेत.
Nashik Crime Agitation FIR Police Cidco