नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल गेममुळे अवघ्या ९ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची बाब शहरात घडली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार पंचवटी परिसरातील अवधूत वाडी येथे घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत वाडीमध्ये राहणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. राहत्या घरीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो सतत मोबाईल गेम खेळात असे. या मोबाईल गेमच्या नादाच त्तयाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे या चिमुरड्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.