नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अश्लिल हावभाव करीत एकाने योगा टिचरचा विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोत घडला. ऑनलाईन क्लास सुरू असतांना काचेच्या रूमजवळ येवून संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत सुरेश बोडके (रा.स्वारबाबानगर सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्रिमुर्ती चौक परिसरात हा प्रकार घडला. पीडिता योगाचे ऑनलाईन क्लास घेते. गुरूवारी (दि.५) सकाळच्या सुमारास ती काचेच्या रूममधून योगाचे ऑनलाईन धडे देत असतांना संशयिताने हे कृत्य केले.
गेल्या दोन दिवसांपासून रूम जवळ येवून संशयित अश्लिल हावभाव करीत असल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.