नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परिचीताने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतून दुचाकीवर लॉजमध्ये घेवून जात संशयिताने हे कृत्य केले असून, अश्लिल फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून संशयिताकडून ब्लॅकमेलींगचा प्रकार वाढल्याने तसेच त्याने थेट आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज रतन मेघवाल (२८ रा. अमृतधाम) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता २०२१ मध्ये केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना हा प्रकार घडला. सकाळच्या सुमारास परिचीत संशयिताने कॉलेज गाठून मुलीस फिरण्याचा बहाणा करून दुचाकीवर सोमेश्वर येथील बालाजी मंदिरात नेले.
यानंतर त्याने त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी लॉजवर घेवून जात बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने मोबाईलमध्ये काढलेल्या अश्लिल फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास थेट आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.