नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोर्टाच्या आदेशाने जप्त केलेली सदनिका कर्जदार दांम्पत्याने बेकायदा बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेने सिल केलेला फ्लॅटचा कब्जा केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपाल धिवरे व गायत्री धिवरे (रा.श्री गजानन पार्क अपा. खर्जुलमळा, सिन्नरफाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत होम फायनान्स कंपनीचे प्रविण अंतरवेलीकर यांनी फिर्याद दिली आहे. अंतरवेलीकर नोकरीस असलेल्या बँकेकडून धिवरे दांम्पत्याने सुमारे २६ लाखाचे गृहकर्ज घेतले होते. कालांतराने त्याच सदनिकेवर १५ लाख ९० हजाराचे टॉकोप घेण्यात आले.
कर्जदार धिवरे दांम्पत्याकडून वेळेवर हप्ते भरण्यास दिरंगाई झाल्याने बँकेकडून कोर्टाच्या आदेशाने जप्ती कारवाई करण्यात आली. सदर सदनिका फायनान्स कंपनीने सिल केलेली असतांना संशयित दांम्पत्याने विनापरवानगी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.