नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्युत महामंडळाच्या उघड्या डीपीचा शॉक लागल्याने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील बजरंग वाडी येथील संताजीनगर येथे ही घटना घडली आहे. अरमान मुन्ना अन्सारी असे मृत बालकाचे नाव आहे. संताजीनगरमध्ये असलेल्या उघड्या डीपीचा शॉक अरमानला लागला होता. या डीपीला कोणत्याही प्रकारची संरक्षण भिंत अथवा जाळी लावलेली नव्हती. तसेच, त्याचा दरवाजाही उघडा होता. त्याला कुठलेही झाकण नव्हते. गेल्या आठवड्यात. २६ जून रोजी लहान मुले संताजीनगरच्या मेकळ्या मैदानात खेळत होती. त्यात अमनाचाही समावेश होता. खेळता खेळता अरमान उघड्या डीपीजवळ आला. तेथे त्याचा चुकून हात लागल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी (२ जुलै) अरमानचे निधन झाले. अरमानचे वडील हे बिगारी कामगार आहेत. अरमानच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
nashik crime 8 year old boy death open transformer electric shock