नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाने तब्बल पाच वर्ष विवाहीतेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पुराव्यासाठी पीडितेच्या पतीचे बनावट आधारकार्ड तयार करून संशयिताने वेगवेगळया ठिकाणी घेवून महिलेवर बलात्कार केला असून त्यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय हरिप्रसाद कनोजी (रा.जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार २०१९ मध्ये संशयिताशी ओळख झाली होती. यावेळी त्याने पीडितेस घरी बोलावून चहामध्ये गुंगीचे औषध टाकून अश्लिल फोटो व व्हिडीओ काढले होते. यानंतर त्याने महिलेस ब्लॅकमेल करीत वारंवार बलात्कार केला. राहते घरी व कारमध्ये तसेच पीडितेच्या पतीचे बनावट आधारकार्ड तयार करून त्याचा विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये पती पत्नी असल्याचे भासवून वापर केला.
या काळात संशयिताने जेलरोड, हॉटेल यात्री, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, गोवा, पालघर,भावली डॅम,पहिणे,त्र्यंबकेश्वर तसेच वैतरणा डॅम आदी भागात घेवून जात महिलेवर बलात्कार केला असून, जातीचा उल्लेख करीत त्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त बारी करीत आहेत.