नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चोरलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून भामट्यांनी महिलेच्या बॅक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोस्टाच्या बचत खात्यातून भामट्यांनी सुमारे ७५ हजाराची रक्कम परस्पर काढून घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला पंडीत भोळे (रा.जाणताराजा कॉलनी,पंचवटी) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. भोळे यांचे पोस्टात सेव्हींग खाते असून त्यांचे एटीएम कार्ड काही दिवसांपूर्वीच गहाळ झाले आहे. गेल्या १४ ऑगष्ट रोजी भामट्यांनी चोरीस गेलेल्या एटीएम कार्डचा वापर करून मखमला बाद नाका
येथील मनपाच्या विभागीय कार्यालय परिसरातील इंडसइंड बँकेच्या एटीएम बुथसह परिसरातील तसेच पुणे आणि सातारा येथील एटीएममधून परस्पर ७५ हजार रूपये काढून घेतले. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.