नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवी मंदिराच्या दानपेटीतील सुमारे २५ हजाराची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश माधव गुंजाळ (रा शुभम पार्क, पवननगर) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम पार्क परिसरातील रेणूका माता मंदिरात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी (दि. २९) मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ही चोरी केली.
मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी गाभा-यातील दानपेटी कश्याने तरी फोडून त्यातील २५ हजारांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.