नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शुक्रवारी वेगवेगळया भागात तीन विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या. त्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. याबाबत म्हसरूळ, गंगापूर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे.
बोरगड येथील पीडिता शुक्रवारी (दि.३०) आपल्या घरात एकटी असतांना परिचीतीने तिचा विनयभंग केला. घरात कुणी नसल्याचे संधी साधत संशयिताने महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने प्रतिकार केल्याने संशयिताने शिवीगाळ करीत महिलेस सोप्यावर ढकलून देत विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असू संशयितास पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूररोड भागात घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.३०) राहते घर खाली करण्यासाठी आलेल्या सासरच्या मंडळीने महिलेसह तिच्या आईस व दोन मुलांना मारहाण केली. त्यातील एका अनोळखीने महिलेच्या मुलाचा गळा दाबला तर नंदईने मुलीचा विनयभंग केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या सासरच्या दहा जणांविरूध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात महिलांचाही समावेश आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.
तिसरी घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील भंगार बाजार भागात घडली. आर्थिक वादातून एकाने महिलेचा विनयभंग केला. पिडीता गुरूवारी (दि.२९) सायंकाळी आपल्या स्क्रॅप दुकानात असतांना संशयित आपल्या साथीदारांसह तेथे आला. तुझ्या वडिलानी माझ्याकडून पैसे घेतले आहेत ते कधी देणार आहे असे बोलून संशयिताने महिलेस शिवीगाळ करीत विनयभंग केला. याघटनेत मारहाण करीत संशयिताने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.