नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पळसे गावात दारूच्या नशेत मारहाण करीत पोटच्या अल्पवयीन गतीमंद मुलीवर नराधम बापानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापास गजाआड केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पळसेगावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि.२८) दुपारी घरात एकटी असतांना ही घटना घडली. दारूच्या नशेत तर्रर्र होवून आलेल्या नराधम बापाने तिला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी निर्दयी नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला.
मुलीची आई सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून नाशिकरोड पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित शिंदे करीत आहेत.