गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये फ्लॅटमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह…खून झाल्याचा प्राथमिक अंदाज

by India Darpan
ऑगस्ट 29, 2024 | 8:18 pm
in क्राईम डायरी
0
crime 71

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फ्लॅटमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याने महिलेचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव नगर येथे एका घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेने घराचे कुलूप उघडले असता ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव गेट पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निशा मयूर नागरे, ३५, रा. कृष्णा प्राईड, सदाशिव नगर, पाथर्डी शिवार असे मृत महिलेचे नाव आहे. त्या या फ्लॅटमध्ये गेल्या एक वर्षांपासून भाडेतत्वावर राहत होत्या. नागरे यांच्या घरी काम करणारी मोलकरीण संगीता खिल्लारे या नेहमीप्रमाणे गुरुवार २९ रोजी काम करण्यासाठी आली असता तिला फ्लॅटच्या दरवाज्याला कुलूप लावलेले आढळून आले. यावेळी तिने आपल्याजवळील चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळेस तिची मालकीण निशा ही मृतावस्थेत आढळून आली. मोलकरणीने आजूबाजूच्या रहिवाशांना घटनेची माहिती दिली. यावेळी खुनाची घटना नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कळवली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

आदल्या दिवशी म्हणजेच बुधवार २८ रोजी निशा नागरे यांनी पतीसोबत जेवायला बाहेर जायचे असल्याची माहिती मोलकरणीने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत महिलेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. तसेच, शवविच्छेदना नंतरच अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२० हजाराची लाच घेणा-याला दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

Next Post

या व्यक्तींनी कुणावरही विसंबून राहू नका, जाणून घ्या, शुक्रवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कुणावरही विसंबून राहू नका, जाणून घ्या, शुक्रवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011