नाशिक – दुसऱ्या पत्नीने घरात घूसून तिचा भाऊ व प्रियकराच्या मदतीने घरातील सहा लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार एकाने केली आहे. याप्रकरणी तक्रारदाराची दुसरी पत्नी नंदा, तिचा भाउ सचिन साळवे,तिचा प्रियकर नंदकुमार रायझाडे अशा तिघांवर गुन्हा दाखळ झाला आहे. पलिसांनी दिलेली माहीती अशी अरुण साखरे (भिमनगर जेल रोड) याच्या तक्रारीनुसार, बुधवारी (ता.१५) ते शुक्रवारी (ता.१७) दरम्यान भिमनगर येथील बेला डिसुझा कॉलनीत तिघा संशयितांनी फिर्यादीच्या घराचा कुलुप दगडाने तोडून घरात प्रवेश करीत, घरातील ५ लाख ५० हजाराची रोकड, ३५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ हजाराचा मोबाईल, चार साड्या आणि दोन एलआयसीच्या पावत्या असा सुमारे साडे सहा लाखांचा ऐवजचोरुन नेला.
शिवशाही बसच्या बॅटऱ्यांची चोरी
नाशिक – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसच्या बॅटऱ्याच चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
तुळशीराम विष्णु गायकवाड (शिवसाईनगर पंचवटी) यांच्या तक्रारीनुसार, राज्य मार्गपरिवहन महामंडळाची शिवशाही
बस (एमएच ०९ ईएम २१९०) शुक्रवारी (ता.१७) महामंडळाच्या नाशिक आगार एक डेपोत उभी केलेली असतांना रात्रीतून चोरट्याने कधीतरी शिवशाही बसच्या दोन टाटा ग्रीन बॅटरी आणि आरटीएन २३, २४ या बॅटऱ्या चोरुन नेल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.