नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी दवाखान्याच्या बाथरूममधील नळ आणि इलेक्ट्रीक बोर्ड चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना औदयोगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. वेभाव विनायक येवले (रा.श्रमिकनगर,सातपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. डॉ. येवले यांचे श्रमिकनगर येथील महादेव मंदिर परिसरात श्रीसाई नावाचे हॉस्पिटल आहे या नवीन हॉस्पिटलमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.१२) ही चोरी केली. दवाखान्यात शिरलेल्या चोरट्यांनी बाथरूममधील महागडे नळ तसेच इलेक्ट्रीक बोर्ड असा सुमारे ७२ हजार ४५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.
बंगल्याच्या बांधकाम साईटवरून चोरट्यानी लोखंडी पोल चोरून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डी.के.नगर भागातील मॉडर्न चौकात बंगल्याच्या बांधकाम साईटवरून चोरट्यानी लोखंडी पोल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत आरसीसी बांधकामासाठी लागणारे पंधरा आयसेक्षन चोरट्यांनी चोरून नेले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष रावजी मोरे (रा.रामकृष्णनगर,म.बाद) यांनी फिर्याद दिली आहे. मोरे बांधकाम व्यावसायीक असून त्यांनी डिके.नगर येथील मॉडर्न चौकात सुरू असलेल्या किशोर शिरसाठ यांच्या बंगल्याचे काम घेतले आहे.र्बंगल्याच्या आरसीसी बांधकामासाठी या साईटवर ठेवलेले सुमारे ३० हजार रूपये किमतीचे १५ लोखंडी आयसेक्षन (पोल) चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि.१३) उघडकीस आली. अधिक तपास पोलीस नाीक गवे करीत आहेत.