नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सेवा निवृत्त मुख्याध्यापकाने चतुर्थश्रेणी महिला कर्मचारीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पंचायत समिती कार्यालयात घडली असून, संशयित मुख्याध्यापक सेवापुस्तकात हयातीची नोंद करण्यासाठी गेला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय वरखेडे असे संशयित मुख्याध्यापकाचे नाव आहे. वरखेडे मंगळवारी (दि.२७) नाशिक पंचायत समिती कार्यालयात सेवा पुस्तकावर हयातीची नोंद करण्यासाठी गेला होता. कार्यालयीन लिपीकाची त्याने भेट घेतल्याने पिडीत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिलेस अडगळीच्या रूममधील कपाटातून सेवापुस्तक काढून आणण्याचे सांगण्यात आले होते.
पीडिता कपाटातील सेवापुस्तकाचा शोध घेत असतांना पाठीमागून रूमध्ये शिरलेल्या संशयिताने महिला कर्मचाराचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल चव्हाण करीत आहेत.