नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदाघाटावर फुलविक्रीचा व्यवसाय सांभाळणा-या महिलेचा एकाने विनयभंग केला. महिला व तिच्या सोबत असलेल्या मुलीस मारहाण करीत संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शुक्रवारी (दि.१६) पिडीता आपला फुलविक्रीचा व्यवसाय सांभाळत असतांना परिचीत असलेला संशयित तेथे आला. मला तू खूप आवडते माझ्याशी प्रेम संबध ठेव असे म्हणत संशयिताने महिलेचा विनयभंग केला.
यावेळी महिलेने नकार देत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला संशयिताने मारहाण केली. महिलेवर संशयिताने हात उचलल्याने तिच्या सोबत असलेल्या मुलीने आरडाओरड केली असता तिलाही संशयिताने मारहाण केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.