नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गाला लागून असलेल्या गरवारे पॉईट भागातील रमाबाई आंबेडकर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ३५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा व महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनिता सुरेश गायकवाड (रा.रमाबाई आंबेडकरनगर,गरवारे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड कुटूंबिय सोमवारी (दि.२६) नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी पेटीचे कुलूप तोडून पेटीत ठेवलेल्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व घराचे कागदपत्र असा सुमारे १ लाख ८३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.अधिक तपास शेवाळे करीत आहेत.