नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणारी पाच मुले मंगळवारी बेपत्ता झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बेपत्ता मुलांमध्ये तीन अल्पवयीन मुलींसह दोन मुलांचा समावेश आहे. मुले पळवणारी टोळी शहरात सक्रीय असल्याच्या अफवांना पेव फुटलेले असतांनाच एकाच दिवशी या घटना घडल्या. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव,म्हसरूळ,पंचवटी आणि सातपूर पोलिसात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना शिलापूर ता.जि.नाशिक येथे घडली. शिलापूर येथील अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. कोणी तरी तिलाही पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात असून कुटूंबियांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
दुसरी घटना पेठरोडवरील मेघराज बेकरी भागात घडली. येथे राहणारी अल्पवयीन मुलगी मंगळवार पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्ही.डी.अहिरे करीत आहेत.
तिसरी घटना निलगीरी बाग भागात घडली. येथे राहणा-या अल्पवयीन मुलीस आतेभावाने पळवून नेल्याचे पालकांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गिरीष यशवंत नवात्रे (२२ रा.के.के.वाघ कॉलेजसमोर) असे संशयिताचे नाव आहे. मुलीस संशयिताने फुल लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार लोहकरे व पोलिस नाईक जाधव करीत आहेत.
तर फुलेनगर आणि प्रबुध्दनगर भागात राहणारे दोन अल्पवयीन मुलेही मंगळवार पासून बेपत्ता आहेत. दोघांना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी आणि सातपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे व उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
Nashik Crime 5 Children’s Absconding in A Day
Kidnapping
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/