नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील उत्तमनगर भागात असलेल्या देवी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुर्ती वरील दागिण्यांसह दानपेटीतील रोकड चोरून नेली. या घटनेत भामट्यांनी सुमारे ४५ हजाराच्या ऐवजावर वर डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश बाळासाहेब काकडे (रा.प्रेरणाचौक,उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. उत्तमनगर येथील प्रेरणा चौकात सप्तश्रृगी माता मंदिर असून या मंदिराची काकडे देखभाल करतात. गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मुर्तीवरील अलंकार व दानपेटीतील सुमारे ३० हजाराची रोकड असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक आवारे करीत आहेत.
गणेश मुर्ती विक्रेत्यास जीवे ठार मारण्याची धमकी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-औद्योगीक वसाहतीत गणेश मुर्ती विक्रेत्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत एका भाईने खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने दरडोई पैश्यांची मागणी सुरू केल्याने मुर्ती विक्रेत्याने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत भालेराव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत रोहन गौतम पारखे (२२ रा.विल्होळी ता.जि.नाशिक ) या युवकाने फिर्याद दिली आहे. पारखे हा गणपती मुर्ती विक्रेता असून त्याने सालाबादाप्रमाणे यंदाही औद्योगीक वसाहतीतील वेलकम हॉटेल भागात मुर्ती विक्रीचा स्टॉल लावला आहे.
शनिवारी (दि.२४) पारखे आपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयिताने त्यास गाठून जीवे ठार मारून टाकण्याची धमकी देत एक हजार रूपये देण्यास भाग पाडले. दुसºया दिवशीही त्याने संपर्क साधून पुन्हा एक हजार रूपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले. दरडोई संशयिताची मुजोरी वाढल्याने पारखे याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
…..