नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील चुचाळे भागात सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या तीन दुचाकी समाजकंटकांनी ज्वलनशिल पदार्थटाकून पेटवून दिल्या. या घटनेत मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर तुकाराम अवचार (रा.बिल्डींग नं. सीएच १५ घरकुल योजना चुंचाळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अवचार यांच्या अॅक्टीव्हा एमएच १५ जेजे २४६३ सह एमएच १५ बीेस ३१८८ आणि एमएच १५ सीडब्ल्यू ६५०९ या दुचाकी भामट्यांनी या घटनेत पेटवून दिल्या. ही घटना गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री घडली.
अज्ञात समाजकंटकाने सोसायटीच्या पार्किंग मध्ये लावलेल्या तीन दुचाकींवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले होते. ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला असून नागरीकांच्या ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी धाव घेत पाण्याचा व मातीचा मारा करीत आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत तिन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास हवादार चव्हाण करीत आहेत.