नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून तरूणास मारहाण करीत खिश्यातील रोकड पळविणा-या तिघा भामट्याना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना गोल्फ क्लब मैदान भागात घडली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश उर्फ आक्या विजय भोईर (रा.भोईरवाडी झोपडपट्टी,चांडकसर्कल ), अरबाज अस्लम शेख (२४) व राकेश दिपक गांगुर्डे (४० रा.सेंट फ्रान्सीस शाळेजवळ,राहूलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुनिल संतोष सिंग (२२ रा.भारतनगर झोपडपट्टी ) या युवकाने फिर्याद दिली आहे. सुनिल सिंग हा युवक सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास भारतनगर कडून शरणपूररोडच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली. वाटेत अचानक पाऊस लागल्याने तो गोल्फ क्लब मैदानाच्या वॉचमन रूमकडे जात असतांना संशयितांनी त्यास अडविले.
यावेळी आम्हाला तिघांना दारू पिण्यास पैसे दे असे म्हणत संशयितांनी सिंग यास बेदम मारहाण केली. यावेळी आक्या नामक व्यक्तीने लाकडी दांडक्याचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाचशे रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत त्रिकुटाने पोबारा केला होता. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयिताना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
…….
सीसीटिव्ही कॅमेरा चोरट्यांनी चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बँकेच्या मेनगेट जवळ लावलेला सीसीटिव्ही कॅमेरा चोरट्यांनी चोरून नेल्याचा त्र्यंबकनाका भागात घडला. या घटनेने बँकेची सुरक्षा चव्हाट्यावर आली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर विजयराव पितळे (रा.अमरावती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना अॅक्सिस बँकेच्या त्र्यंबकनाका शाखेत घडली. व्यवस्थापक पितळे यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.१९) ही चोर झाली. वर्दळीच्या या शाखेत शिरलेल्या चोरट्याने मेनगेट भागात लावलेला सुमारे सहा हजार रूपये किमतीचा सीसीटिव्ही कॅमेरा परस्पर काढून नेला.
मेनगेटवरील हालचाली आढळून न आल्याने यंत्रणेच्या तपासणीत चोरीचा हा प्रकार समोर आला असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.