नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनी लॅण्डीगसह विवीध कारणांचा बहाणा करून भामट्यांनी शहरातील तीघांना तब्बल दीड कोटींना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात संबधीतानी आपल्या बँक खात्यातील रकमा भामटयांनी सांगितलेल्या खात्यात ऑनलाईन वर्ग केल्या आहेत. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एकास गेल्या १५ जुलै रोजी संपर्क साधण्यात आला होता. यावेळी सीबीआय मधून बोलत असल्याची बतावणी करीत भामट्याने दांम्पत्याच्या मोबाईल क्रमांकावरून मनी लॅण्डींग झाल्याचे आढळून आले असून कारवाई टाळण्यासाठी तुमच्या बॅक खात्यात जमा असलेली रक्कम तात्काळ वर्ग करण्याचा सल्ला दिल्याने तब्बल एक कोटी ३० लाख रूपये वर्ग करण्यात आले.
दुस-या घटनेत हितेश महाले यांना फेडेक्स कर्मचारी असल्याची भासवून बेकायदा पार्सलच्या बहाण्याने ५ लाख १८ हजार ९९८ रूपये अन्य बँक खात्यात वर्ग करण्यास सांगण्यात आले.तर दिपाली मंडलिक या महिलेस मुंबई सायबर क्राईम ब्रॅच मधून बोलत असल्याचे सांगून आधार कार्ड गैरकानुनी प्रकरणात वापरल्याचे सांगून ६ लाख ९ हजार ८१ रूपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. या तिन्ही घटनांमध्ये भामट्यांनी १ कोटी ४२ लाख ९ हजार ७९ रूपयाची फसवणुक करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.