नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अंबड परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंबड परिसरातील जाधव संकुल येथे कपाट अंगावर पडून तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात अतिशय हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय गोंडस असलेला हा चिमुकला गतप्राण झाल्याने परिसरात अतिशय शोकाकुल वातावरण आहे.
शौर्य विश्वकर्मा असे चिमुकल्याचे मृत चिमुकल्याचे नाव आहे. अंबड परिसरातील जाधव संकुल येथे विश्वकर्मा कुटुंब राहते. सर्व कुटुंब झोपेत असतांना तीन वर्षीय शौर्यच्या अंगावर घरातील लाकडी कपाट अचानक पडले. यामुळे शौर्यला श्वास घेण्यातही अडचणी आल्या. तसेच, हे कपाट अचानक कोसळल्याने तो क्षणार्धातच निपचित पडला. ही बाब घरच्यांचा लक्षात आली. कपाट अंगावर पडल्याचे कुटुंबांच्या तातडीने लक्षात आली. त्यांनी तत्काळ शौर्यला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून शौर्यला मृत घोषित केले.
शौर्य हा अतिशय गोंडस होता. कुटुंबियांचा त्याच्यावर प्रचंड जीव होता. नुकतात तो चालू लागला होता. त्यामुळे कुटुंबियांनाही त्याचे मोठे कौतुक होते. जाधव संकुलमध्ये शौर्य हा संपूर्ण गल्लीतच चांगलाच परिचीत झाला होता. सतत हसमुख राहणारा शौर्य अचानक झालेल्या या घटनेमुळे गतप्राण झाला आहे. यामुळे संपूर्ण जाधव संकुल परिसरात अतिशय हळहळ व्यक्त होत आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651403664370831361?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651403625829392384?s=20
Nashik Crime 3 Year Old Boy Death Cupboard Collapse