नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील वृदावननगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३७ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात दहा हजाराच्या रोकडसह सोन्या चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय धर्मेद्र परदेशी (रा.साई संकुल रो हाऊस,मयुर हॉस्पिटल समोर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. परदेशी कुटूंबिय रविवार (दि,१८) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.
२४ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-महादेववाडी भागात राहणा-या २४ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितेश कुमार बबन पासवान (रा.महालक्ष्मी चौक,महादेववाडी,सातपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. पासवान याने सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास टॉवेल बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल बबन पासवान यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.