नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इलेक्ट्रीक शॉक लागल्याने २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना संसरीगाव ता.जि.नाशिक येथे घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवन भिमराव अस्वले (रा.चाळ झोपडपट्टी,संसरीगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. अस्वले घरातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्याने रविवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास दुरूस्ती करीत असतांना ही घटना घडली. वायरिंग तपासणी करीत असतांना त्यास इलेक्ट्रीकचा शॉक लागला होता. या घटनेत तो दुरवर फेकला गेल्याने जखमी झाला होता. नातेवाईक दुर्गा घोष यांनी त्यास तातडीने कॅन्टोमेंट हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.
……
४५ वर्षीय महिलेची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी शिवारातील ज्ञानेश्वर नगर भागात राहणा-या ४५ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैशाली राजेंद्र आहिरे (रा.गणराज अपा. आव्हाड पेट्रोल पंपा समोर,ज्ञानेश्वरनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली आहिरे यांनी रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भाच जावई पंकज कुवर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.