नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातून पुन्हा दोन मुली बेपत्ता झाल्या असून, त्यांचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला आहे. त्यात एका बाहेरगावच्या शाळकरी मुलीचा समावेश असून, या प्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.
शहरातील शाळेत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी मंगळवार (दि.२२) पासून बेपत्ता आहे. शाळा सुटल्यानंतर ती बसमधून आपल्या मैत्रीणीसमवेत घरी जात असतांना ही घटना घडली. निमाणी भागात अन्य मैत्रीणीला भेटून येते असे सांगून ती बसमधून उतरली ती अद्याप घरी परतली नाही. कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
दुसरी घटना जुने नाशिक भागात घडली. अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि.२३) घरात कुणास काही एक न सांगता निघून गेली आहे. तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
Nashik Crime 2 Minor Girls Absconding
Police Kidnapping FIR Complaint