नाशिक – रेडक्राॉस सिग्नल ते नेहरु गार्डन या दरम्यान सार्वजनिक वाचनालयासमोरील रस्त्यावरुन भरदिवसा २ लाख रुपयांची लूट झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोरच हा प्रकार घडला आहे. एक व्यक्ती बँकेतून पैसे घेऊन बाहेर आली. त्याचवेळी चोरटे गाडीवरुन आले. आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली. तसेच, त्यांनी गाडी वेगाने नेत पसार झाले. हा सर्व प्रकार लक्षात येताच त्या व्यक्तीने आरडाओरडा केला. त्याची दखल घेत बँकेच्या सुरक्षा रक्षक व अन्य व्यक्तींनी तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह परिसरातील, चौकातील व अन्य दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)