नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या दोघी बहिणींपैकी एकीचा दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या इसमाने विनयभंग केल्याचा प्रकार सातपूर येथील कार्बननाका बसस्टॉप भागात घडला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश मोहन ठाकूर (३२ रा.सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. परिसरात राहणा-या पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडितेसह तिची बहिण रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात जात असतांना ही घटना घडली.
रेल्वेस्थानकात जाण्यासाठी त्या दोघी कार्बननाका बसस्टॉपवर सीटी लिंकबसची प्रतिक्षा करीत उभ्या असतांना मद्याच्या नशेत तर्रर्र होवून आलेल्या संशयिताने पिडीतेचा विनयभंग केला. अधिक तपा हवालदार मुसळे करीत आहेत.