सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येची मालिका सुरूच…तीन तरूणांची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 17, 2024 | 11:50 pm
in क्राईम डायरी
0
sucide


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१६) वेगवेगळया भागात राहणा-या तीन तरूणांनी आत्महत्या केली. त्यातील दोघांनी गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका,पंचवटी व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

भारतनगर येथील शिवाजीवाडीत राहणा-या दुर्गेश केवल मेहरा (२५) या युवकाने गुरूवारी (दि.१५) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी रात्री त्यास उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत. दुसरी घटना मखमलाबाद लिंकरोड भागात घडली. हर्षल संजय सोनकांबळे (२२ रा.प्लेबॉक्स क्रिकेट ग्राऊंड, इम्पेरिअल बिल्डींग समोर) या तरूणाने शुक्रवारी (दि.१६) अज्ञात कारणातून क्रिकेट ग्राऊंड लगत असलेल्या लोखंडी कॅबीनमधील सिलींगला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रतिभा पगार यांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.

तर वाल्मिक बाळासाहेब राऊत (२७ रा. ओमकार अपा.औटेमळा नाशिकरोड) या युवकाने गुरूवारी (दि.१५) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गॅलरीच्या हुकाला उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. वडिल बाळासाहेब राऊत यांनी त्यास तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिडको परिसरात घरफोडी…१ लाख ४ हजाराच्या ऐवजावर डल्ला

Next Post

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2024 08 17 at 7.17.06 PM 1140x570 1

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011