नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेट खेळताना ३२ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२४) कॉलेज रोड परिसरात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आकाश रवींद्र वाटेकर (३२, रा. राणेनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. आकाश वाटेकर हा मंगळवारी सायंकाळी एन. बी. टी. लॉ महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यास अस्वस्थ वाटले. त्यामुळे मित्र क्षितीज पोटनिस याने त्यास तात्काळ नजीकच्या निम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आकाशला तपासून मृत घोषीत केले. या घटनेने सहकाºयांना धक्का बसला. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
जुगार खेळणारा जेरबंद
नाशिकरोड येथील वर्दळीच्या ठिकाणी जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाºया एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित अंक अकड्यावर पैसे लावून कल्याण मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे दोन हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश निळकंठ कुलथे (३१ रा.सवर्ण सोसा.सुंदरनगर चौकी शेजारी देवळाली गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शिवाजी पुतळा भागात एक जण मटका जुगार खेळण्यास लोकांना प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता संशयित राजेंद्र कॉलनीतील इलेक्ट्रीक डिपी जवळ उघड्यावर अंक अकड्यावर कल्याण मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. याप्रकरणी हवालदार सुगन साबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत.
Nashik Cricketer Heart Attack Youth Death